बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण…”, नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक

मुंबई | नाशिमधीलपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून  आॉक्सिजन टँकमध्ये भरत असताना गळती झाल्यामुळे 22 रूग्णांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. गळती झाल्यामुळे रूग्णालयातील ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रूग्णांचा मृत्यु झाला. या घटनेबाबत देशातून हळहळ व्यक्त होत आहे. अशातच यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, अशा मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहेत. मृत झालेल्या 22 जणांंमध्ये 11 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एक महिला आपलं दुःख आणि रुग्णालयातील अडचणी सांगत होती. यामध्ये तिने दोन-दोन दिवस लोक वेटिंगवर ठेवत असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर आपला आक्रोश व्यक्त करताना हे हॉटेल आहे का की वेटिंगवर ठेवता? असा सवाल तिने केला.

दरम्यान, माझी मम्मी क्लीअर झाली होती, फार चांगली होती, जेवण करत होती. अर्ध्या तासापूर्वी व्हेंटिलेटर बंद पडलं अन् फडफड कोंबडीवाणी मेली ती फडफडून, अशा शब्दात महिलेने रुग्णालयाबाहेर आक्रोश केला.

 

थोडक्यात बातम्या- 

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रया; म्हणाले…

“मम्मी बरी झालेली, पण ॲाक्सिजन संपला अन् फडफड कोंबडीवाणी मेली ती”

…म्हणून पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्याच पत्नीवर झाडली गोळी

रुग्णालयासमोर गर्दी करणाऱ्या नातेवाईकांची केली कोरोना टेस्ट, तब्बल एवढे लोक निघाले कोरोनाबाधित

“नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न”, मुख्यमंत्र्यांची मृतांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More