Top News महाराष्ट्र रत्नागिरी

धक्कादायक! रत्नागिरीतील राजापूरमध्ये 200 ते 250 जणांच्या जमावाकडून कोरोना योद्ध्यांवर हल्ला!

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना योद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसतायत. तर याच कोरोना योद्ध्यांवर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे या ठिकाणी घडली आहे.

पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास 200 ते 250 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला आहे. साखरी नाटे या भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानं सर्व्हेकरता गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी तिथल्या नागरिकांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं.

मात्र जमावाने पोलिसांचं ऐकलं नाही. यावेळी 200 ते 250 जणांच्या जमावाने थेट हल्ला चढवला. यावेळी जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीचं नुकसान झालं. याशिवाय वैद्यकीय विभाग आणि पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झाला. याप्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 1379वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या 813 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 479 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन नाही. पण, राज्य शासनाचे नियम मात्र पाळले जात आहेत. कोरोना रूग्णांची संख्या ही वाढत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अरे बापरे… एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागू शकतात तब्बल एवढे हजार रूपये!

राष्ट्रवादी युवक व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं पाठवणार!

लक्षणं नसलेल्या रूग्णांकरिता कोल्हापूर महापालिकेने घेतला मोठा निर्णय

“शिवछत्रपतींचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जनतेची सेवा करतोय…”

“भाजपचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी, केवळ निवडणुकीपुरते शिवाजी महाराज हवेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या