रत्नागिरी | मुसळधार पावसाने खेड शहरातील जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता मोठ्या प्रमाणात खचला. संतप्त नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांना पुलाच्या कठड्याला बांधून ठेवलं.
नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता या वर्षी वाहतूकीसाठी सुरु होणार होता. त्याच्या लोकार्पणापूर्वीच याची अवस्था झाली. त्यामुळे स्थानिक आणि वाहनचालक संतापले आहेत.
पूलाची अशी परिस्थिती पाहून खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक आणि नागरिकांनी यांनी शनिवारी रात्रीपासून रास्ता रोको केला.
कार्यकारी अभियंता बामणे आणि गायकवाड हे पूलाची पाहणी करण्यासाठी आले तेव्हा संतप्त नागरीकांनी त्यांनाच पुलाच्या कठड्याला बांधलं. रस्त्याची डागडूजी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या-
-इंग्लंडला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज
-पबजी खेळू न दिल्यामुळे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
-महाराष्ट्रात वंचितला सोबत घ्या; राहुल गांधींच्या राज्यातील नेत्यांना सूचना
-ह्या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा; वंचितचा अल्टिमेटम
Comments are closed.