Top News महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | गुजरात आणि लगतच्या परिसरातील हवामान बदलासह अरबी समुद्रातील हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. 3 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याला आणि 4 जुलै रोजी रायगड जिल्हयाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन्ही जिल्हयात मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या किनारी भागासह संपुर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील. 3 आणि 4 जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. 4 जुलै रोजी पालघर आणि ठाणे या भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा या ठिकाणी 3,4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, जून 2020 मध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, जालना, लातूर तर अहमदनगरसह सोलापूरचा समावेश आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोनं 50 हजारांच्या पार

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या