महाराष्ट्र रत्नागिरी

वडिलांचं ‘हे’ वाक्य जिव्हारी लागलं, म्हणून 15 वर्षीय तरूणीनं घेतला गळफास

रत्नागिरी | लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहेत. यावर तोडगा म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अगदी खेड्यापाड्यांतील शाळांमध्ये वापरण्यात येतोय. मात्र ऑनलाईन शिक्षण घेत असताना वडिलांनी आपल्या बोललेलं एक वाक्य मुलीच्या इतकं जिव्हारी लागलं की 15 वर्षीय तरूणीनं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

शहरातील सोमेश्वर मुस्लीम मोहल्ला भागात दाऊद कुटूंबीय राहत होतं. या कुटूंबातील मारिया आजिम दाऊद ही आठवीमध्ये शिक्षण घेत होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानं मारियाची ऑनलाईन शाळा सुरू होती. फक्त ऑनलाईन क्लासेस साठीच मोबाइलचा वापर करायचा अशी सक्त ताकीदच मारियाच्या वडिलांनी तिला दिली.

मात्र, मारिया या मोबाईलवर गेम खेळत असताना तीच्या वडिलांना सापडली. वडिलांनी रागाला जाऊन ‘यापुढे गेम खेळू नकोस’ असा चांगला ओरडा दिला. वडिलांनी ओरडल्याचा राग मनात धरून मारियानं ओढणीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

बुधवारी सकाळी उठल्यावर घरातील कुटूंबीयांना मारिया झोपलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. शोधाशोध सुरू करताच घरातील एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थितीत ती आढळून आली. या घटनेनं कुटूंबीयांना धक्का बसला आहे. अवघ्या 15 वर्षीय तरूणीनं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मेडिकलचं शिक्षण घेत असलेल्या मुलीचा प्रताप! स्वतःच्या घरात प्रियकरासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

कुलर ठरला जीवघेणा; तीन लहानग्या बहिणींनी जाग्यावरच सोडला जीव!

नवीन शिक्षण धोरणाबाबत चिंता, सचिन सावंतांचे एकावर एक ट्विट करत केंद्राला प्रश्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या