नागपूर | गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. ते नागपूर पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टेंनी शेतकऱ्यांना फसवून बनावट कंपन्यांची स्थापना केली. यात शेतकऱ्यांच्या नावे 5 हजार 500 कोटी रूपयांचे कर्ज घेतलं. गुट्टेंनी कोट्यवधी रूपये बुडवले आहेत, असे मुंडेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, हे प्रकरण दाबण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावलं जात आहे. तसंच दमदाटीही करण्यात येत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
पहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या–
-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?
-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!
-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे
-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले
-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!
Comments are closed.