नांदेड | माझा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भाने आम्ही पवार साहेबांना भेटलो, असा खुलासा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. ते नांदेड विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
रासपचे नेते महादेव जानकर यांच्याबरोबर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. यावर रत्नाकर गुट्टे यांनी स्पष्टीकरण दिलं.
रासपचे नेते महादेव जानकर यांनी आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानं भाजपचा आणखी एक मित्र दुरावणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, या सर्व चर्चा चुकीच्या असून, साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही दोन्ही नेत्यांना भेटलो, असं रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!
कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर
“…तर तो खऱ्या अर्थाने डिसले गुरुजींचा सत्कार ठरला असता”
“टिकटाॅकवर ओळख झालेल्या महिलेकडून मुलावर बलात्कार”; वडिलांची पोलिसात तक्रार
शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी स्वत:ला दिली तानाजीची उपमा; म्हणाले…
Comments are closed.