बीड | महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान दिलं आहे. तुमच्या मेव्हण्याची जिरवली, आता तुमचीपण जिरवू, असं रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे.
रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याला सरकारने गाळप करण्याची परवानगी दिलेली नाही, त्यामुळे रत्नाकर गुट्टे संतप्त झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली आहे.
गंगाखेड शुगर्सनं सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, तरी राजकीय आकसापोटी कारखान्याच्या गाळपास परवानगी दिलेली नाही, असा आरोप त्यांनी केलाय. गंगाखेड शुगर्सला ज्या अटी लावल्या त्या तुमच्या कारखान्याला का नाहीत?, असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, ज्यांच्या कुणात खुमखुमी आहे त्यांनी समोर यावं, आपण लढण्यास तयार आहोत. तुम्ही पालकमंत्री आहात. तुमच्या मेव्हण्याची जिरवली, तुमचीपण जिरवू, असं थेट आव्हान त्यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
एकनाथ खडसे मोठा गौप्यस्फोट करणार; संध्याकाळी ‘या’ विषयावर पत्रकार परिषद
मोदींच्या सीरम भेटीनंतर कोरोना लसीच्या साठवणुकीबाबत मोठा निर्णय
आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शितल आमटे यांची सोशल मीडियावर सूचक पोस्ट
कोरोनाचा धोका वाढला; मुंबईतून समोर आली धक्कादायक माहिती
शितल आमटे यांनी का केली आत्महत्या?