मुंबई | कोरोनाने जगभरात धूमाकूळ घातलेला असताना भारतातून कोरोना कायमचा हद्दपार व्हावा, यासाठी ‘कोरोना गो’ चा नारा आठवलेंनी दिला होता. त्यांच्या याच नाऱ्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही आठवलेंच्या नाऱ्याची ट्वीट करून खिल्ली उडवली आहे.
केंद्रात गो गो म्हणून बघा, कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही, असं म्हणत त्यांनी रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. तसंच तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही असं म्हणत महाराष्ट्रातलं सरकार 5 वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
रामदास आठवले साहेब तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही. केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही. आठवले म्हणून पाठवले, असं ट्वीट करत चाकणकरांनी आठवलेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, कोरोना गो.. कोरोनो गो…. नंतर आता ‘महाविकास आघाडी गो’, असं म्हणावं लागेल, असं ते म्हणाले होते. तर महाराष्ट्र विकास आघाडीला इशारा देत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे, अशी भविष्यवाणी देखील त्यांनी यावेळी केली होती.
मा.@RamdasAthawale साहेब तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही.केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही.
.
आठवले म्हणून पाठवले.@NCPspeaks @SpeaksMVAhttps://t.co/xwVfOy86S6— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मोदी सरकार म्हणजे सुटाबुटातलं लुटारू सरकार- बाळासाहेब थोरात
नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे 5 संशयित रूग्ण पळाले
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी
Comments are closed.