बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इंदोरीकर महाराजांचा हा व्हीडिओ बघाच’; रूपाली ठोंबरेंचा तृप्ती देसाईंना टोला

मुंबई | इंदोरीकर महाराज त्यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. तसेच त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेकांनी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी दिला होता. यावरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी इंदोरीकर महाराजांचा एक जुना व्हीडिओ शेअर करत तृप्ती देसाईंना टोला लगावला आहे.

रूपाली ठोंबरेंनी शेअर केलेल्या व्हीडिेओमध्ये इंदोरीकर महाराज मुलींचे महत्त्व समाजाला कीर्तनातून सांगत असल्याचं दिसतं आहे.

हा व्हीडिओ पाहा. अजून काय हवं आणि अशा लोकांवर गुन्हे दाखल करा म्हणतात. श्रुपणखा वृत्ती डोकं ठिकाणावर नसतं ना… श्रुपणखा विकृती बाकी काही नाही, असं रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत”

एमआयएम भाजपची बी टीम- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या- 

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंंतर शरद पवार-उद्धव ठाकरे आज एका मंचावर

आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट

“आम्ही झोपेत असलो तरी सावधपणे काम केलंय ,चौकशीला आम्ही घाबरत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More