मुंबई | कालपासून ईडीचे कोणीच आलं नाही. आता मी माझा माणूस भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लागवला आहे.
हे सर्व राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करुद्या. ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी उघडउघड भाजप आणि मोदी सरकारवर टीका केल्यानेच ही ईडीची नोटीस पाठवल्याचा आरोप शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.
दरम्यान, पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस
हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली
सिनेमा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी केला हा अजब जुगाड!
गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावणं महागात पडणार!
“असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच”