बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे’; राऊतांनी शिंदे गटाची उडवली खिल्ली

नवी दिल्ली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सुरू असलेला प्रकार हा कॉमेडी एक्सप्रेस सीजन 2 आहे. लोकं हसतायेत लोक मजा घेत आहे, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

स्वतः मुख्यमंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आमदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न होताय. तसेच संराष्ट्रीय कार्यकारणी बनवण्याचा अधिकारी यांना नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारीणी घोषित करू शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी घोषित करण्याचा अधिकार त्यांना नाही. शिवसेना आजही भक्कमपणे उभी आहे, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

उद्धव ठाकरेंकडून कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; महत्त्वाची माहिती समोर

SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर!

“लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More