बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवप्रसाद काय असतो, ते राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं- नितेश राणे

मुंबई | दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवनसमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यावेळी परिस्थिती शांत करण्यासाठी पोलीसांना यावं लागलं होतं. हे प्रकरण कुठं निवळत नाही तर, आज पुन्हा कोकणात सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, हाणामारी झाली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवप्रसाद काय असतो, हे संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं, असं लिहिलं आहे. शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर संजय राऊतांनी केलेल्या शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीचा संदर्भ घेऊन नितेश राणेंनी संजय राऊतांवर चांगलाच पलटवार केला आहे.

आज आमच्या कार्यकर्त्यांनी वैभव नाईकना पोटभर शिवप्रसाद दिला आहे. पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो, सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की, असंही नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांना टॅग देखील केलं आहे.

दरम्यान, आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार भाजपला पेट्रोलच्या दरवाढीवरून उचकवण्यासाठी केला जात असल्याचं कळताच राणे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता.

थोडक्यात बातम्या-

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More