मुंबई | राज्यात विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी परत एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी राऊतांनी मराठीचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्यांनी मुंबईत 100 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी मुंबईला लुटलं आहे, असे आरोप राऊतांनी केले होते. त्यावर उत्तर देताना सोमय्यांनी राऊतांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलेलं आहे.
मी मुंबईचा मराठी माणूस आहे, हे शहर आमच्या बापाचं आहे, तुमच्यासारख्यांचं नाही, तुम्ही मुंबईला लुटत आहात, असा आरोप राऊतांनी सोमय्यांवर केला आहे. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराचे मुख्य सुत्रधार आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, लवकरच भाजपच्या दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात ते दोन आमदार कोण?, ही चर्चा रंगली आहे.
थोडक्यात बातम्या –
सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?
संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
…अन् संजय राऊत आणि अजित पवार आपापसातच भिडले
काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
Comments are closed.