विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीबाबत राऊतांचा मोठा दावा!

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधानसभेत 200 आणि लोकसभेत 40 जिंकेल, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

कसब्यातील निकालावरून संजय राऊत यांनी भाजपला (BJP) डिवचलं आहे. कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असं म्हणत राऊतांनी भाजप (Bjp) आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

कसबा आणि चिंचवड दोन्ही निवडणुकांनी धडे दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एखादा बंडखोर. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला हा धडा आहे. कसब्याचा हा निकाल हा राज्याच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

2024पर्यंत महाविकास आघाडीने मजबूतीनं एकत्र काम केलं, एकजूट दाखवली तर विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्ष अधिक जागा निवडून येतील. लोकसभेला 40 पेक्षा अधिक जागा जिंकू. हे मी खात्रीने सांगतो, असं संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-