बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी, म्हणाले….

मुंबई| गेल्या बऱ्याच दिवसांपासून भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावरुन वाद रंगला आहे. आज अखेर या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयावर आज निकाल दिल्यानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच या निर्णयावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत न्यायालयाने विधानसभेच्या अधिकारावर अतिक्रमण केलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं

भाजपच्या आरोपासंबंधी संजय राऊत म्हणाले की, आमच्या 12 आमदारांची फाईल दाबून ठेवली आहे. ती सुध्दा राजकीय सुडापोटीच ठेवली आहे ना? 12 आमदार दोन वर्षांपासून त्यांचा अधिकार, स्वातंत्र्य लोकशाहीत गाजवू शकत नाहीत, प्रश्न मांडू शकत नाहीत. हे सुद्धा सुडाचं राजकारण नाही का? न्यायालयाचा हस्तक्षेप, राज्यघटनेसंदर्भात गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप, सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप हे लोकशाही मृत्यूपंथाला लागल्याचं चिन्ह आहे, असंही यावेळी ते म्हणाले.

या याचिकेवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुनावणी सुरु होती. दरम्यान आज अखेर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सगळ्यांनाच हैराण केलं आहे.

थो़डक्यात बातम्या – 

राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र ‘मास्क फ्री’ होणार का?, ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

लस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मेडिकलमध्येही मिळणार ‘या’ दोन लस

काँग्रेसला मोठं भगदाड! तब्बल 28 नगरसेवकांचा अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

‘माझ्या ब्राचे माप देव घेत आ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More