बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रं लिहिलं आहे. सरनाईक यांनी ठाकरेंना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडालीये. कारण सरनाईक यांनी या पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन शिवसेनेला केलं आहे. सरनाईक यांच्या या पत्रावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, जर एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्याव असं काय आहे. सरनाईक यांंनी लिहिलेलं ते पत्र खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे जो तुमच्या माध्यमातून मला कळला आहे. तो मुद्दा असा आहे की, महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? हा एक गंभीर आरोप असून त्याचा सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे.

10 जून रोजी सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

तसेत सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी पत्रात केल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

खुशखबर! आज चांदी 2 हजारांनी तर सोनं 600 रुपयांनी उतरलं; वाचा ताजे दर

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More