सोमय्यांना आणखी एक झटका; राऊतांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) विरूद्ध शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) वाद आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ट्विट करत गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार संजय राऊतांनी आज सकाळीच ट्विट करत किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. राऊतांनी 5 हजार 600 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड अर्थात एनएसईएलच्या (NSEL) 5 हजार 600 कोटी रूपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वत: किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले, तमाशा केला, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, 2018 व 2019 असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रूपये त्याच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी ‘किरीट का कमाल’ नावाखाली ट्विट करत सोमय्यांवर हे गंभीर आरोप केले आहेत.
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदललं?, वाचा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर
‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून…’; नाना पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ
“राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं”
‘…तर लोकांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं’, निलेश राणेंची बोचरी टीका
“शरद पवार भाजपला घाबरतात, एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते”
Comments are closed.