‘तो खासदार परत दिसणार नाही’; राऊतांचा दिल्लीतून गंभीर इशारा

नवी दिल्ली | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी पत्रकार परिषद घेऊन अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) गंभीर आरोप केला होता.

रिया चक्रवर्तीला 44 फोन आले होते. AU या नावाने हे फोन आले होते. हे AU कोण आहेत? याची चौकशी करा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली होती. तसेच या नावाचा आदित्य ठाकरे यांच्या नावाशीही संबंध जोडण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. याचे पडसाद राज्यातील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले.

आता राहुल शेवाळेंवर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल शेवाळे म्हणजे देशाचे अॅटर्नी जनरल नाहीत. उद्या ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत, असा इशारा राहुल शेवाळेंनी दिलाय.

मला त्यांच्याबद्दल सांगू नका. आम्हाला कायदा कळतो. आम्ही 20 वर्ष संसदेत आहोत. आम्ही कायदा बनवणारे आहोत. आम्हीही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे कायदा आम्हालाही कळतो, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, शिंदे सरकारला अनेक शेपट्या फुटल्या आहेत. ते शेपट्या आत घालत आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-