मुंबई | ठाण्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली असून यात महिला जखमी झाली आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय.
पोलिसांना मी सांगू इच्छितो, बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना सांगू इच्छितो की ठाण्यात आम्हालाही घुसता येतं. ठाण्यात तुम्हाला स्वत:ला घरात कोंडून घ्यावं लागेल. त्यामुळे हे आम्हाला तु्म्ही सांगू नका, असं संजय राऊत म्हणाले.
ठाण्यातले पोलीस गुंड टोळीत सामील झाले आहेत का? तुमचे पोलीस 24 तास घरी बसवा, मग हल्ले काय आहेत ते आम्ही दाखवू, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगतोय. तुम्ही बाजारबुणगे, बाजारबुणगे म्हणताय. तुमच्यात गृहमंत्री म्हणून हिंमत असेल, तर या ठाण्यातल्या बाजारबुणग्यांना आवरा, असं राऊत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-