बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “सीतेचं अपहरण करून रावणाने…”

जयपूर | देशभरात अनेक नेते वादग्रस्त वक्तव्ये करत लोकांमध्ये असंतोष पसरवतात. नेत्यांनी अकलेचे तारे तोडलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता राजस्थानातील बोहेडा येथील एका कार्यक्रमात राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

रावणाने सीतेचे अपहरण करून कोणताही मोठा गुन्हा केला नाही. कारण रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता. रावणाने सीतेला कधीही कलंकीत केले नाही. गुलाबचंद कटारिया यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राजस्थानातील माजी आमदार रणधीर सिंह भींडर यांनी यांनी व्हिडीओ शेअर करत भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रावणाने सीता मातेचे अपहरण करून कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हणणाऱ्यांची क्षुद्र मानसिकता दिसून येते, असं रणधीर सिंह भींडर म्हणाले आहेत.

दरम्यान, कटारिया हे धार्मिक ग्रंथ रामायणाचा अपमान करत आहेत. महाराणा प्रताप, भगवान राम आणि सीता माता यांचा अपमान करतात, अशा व्यक्तींवर जाहीर बहिष्कार घातला पाहिजे, असं रणधीर सिंह भींडर यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडिओ-  

थोडक्यात बातम्या- 

पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

‘आम्ही दादागिरी केली असती तर…’; संदीपान भूमरे यांचं राजेश टोपेंना प्रत्युत्तर

‘महिलेसमोर नाक घासायला लावलं’, अपमान सहन न झाल्यानं तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ

‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More