रवीना टंडनच्या मुलीचा आंतरधर्मीय विवाह; रवीनाने केला मोठा खुलासा

Raveena Tandon

Raveena Tandon l ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आजही तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. रवीनाची लेक राशा थडानी (Rasha Thadani) हिने नुकतेच ‘आझाद’ (Azaad) सिनेमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले आहे. पण रवीनाला फक्त राशाच नाही तर आणखी दोन मुली आहेत.

रवीनाने वयाच्या २१ व्या वर्षीच दोन मुलींना दत्तक (Adopt) घेतले होते आणि त्यांचे लग्नही लावून दिले. यातील एकीचा आंतरधर्मीय विवाह (Interfaith Marriage) होता. या लग्नाबद्दलची एक खास गोष्ट रवीनाने एका मुलाखतीत सांगितली होती.

रवीना टंडनने २००४ साली बिझनेसमन अनिल थडानीशी (Anil Thadani) लग्नगाठ बांधली. त्याआधीच तिने वयाच्या २१ व्या वर्षी छाया (Chhaya) आणि पूजा (Pooja) या दोन मुलींची जबाबदारी घेतली होती.

या दोघीही रवीनाच्या एका चुलत बहिणीच्या (Cousin) मुली आहेत. चुलत बहिणीच्या निधनानंतर तिने त्यांची जबाबदारी घेतली. रवीनाची दत्तक लेक छाया हिचा आंतरधर्मीय विवाह झाला. रवीनानेच हे लग्न लावून दिले.

दोन संस्कृतींचा मिलाफ :

या लग्नाविषयी रवीना म्हणाली, “माझ्या लेकीचा आंतरधर्मीय विवाह झाला होता. मी खूप आनंदी होते. आम्ही छायाची चुडा सेरेमनी (Chooda Ceremony) केली. गाऊनसोबतच (Gown) तिला चुडा घातला. त्यांनी चर्चमध्ये (Church) वचन घेतल्यानंतर तिथेच तिला मंगळसूत्रही (Mangalsutra) घातलं. चर्चमध्येच तिच्या भांगेत सिंदूरही (Sindoor) भरलं. तिच्या लग्नात दोन्ही धर्म एकत्र आले होते.” यावरून रवीनाने कशाप्रकारे दोन संस्कृतींचा आदर करत हे लग्न लावून दिले हे दिसून येते.

News Title: raveena-tandon-adopted-daughter-interfaith-marriage-actress-shares-experience

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .