अभिनेत्री रवीना टंडनचा मद्यधुंद अवस्थेतला ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

Raveena Tandon | अभिनेत्री रवीना टंडन कायम तिच्या फिटनेसनी आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. 90 च्या दशकात रवीनाने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. आज देखील रवीनाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर देखील रवीना आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ आणि फोटोज शेअर करताना दिसत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर रवीनाचा चक्क शीवीगाळ गेल्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील वांद्रे परिसरातील रिझवी काॅलेजजवळ रात्री रवीना टंडनच्या (Raveena Tandon) ड्राइव्हरने कार्टर रोडवर तीन जणांना धडक दिली. दरम्यान, यावेळी वांद्रे परिसरातील काही स्थानिक लोकांकडून गाडी अडवण्यात आली. या वेळी रवीना टंडन (Raveena Tandon) मद्यधुंद अवस्थेत अढळली. पुढे रवीनाने गाडीतून खाली उतरुन पीडितांना शिवीगाळ आणि मारहाण केली. सध्या सोशल मीडियावर रवीनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ-

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवीना टंडनला (Raveena Tandon) वांद्रे परिसरातील काही स्थानकांनी घेरलं असल्याचं दिसत आहे. घडत असलेल्या प्रकरानंतर रवीनाचा शीवीगाळ करत असतानाचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला जात होता. या वेळी रवीनाने स्थानिक लोकांना माझा व्हिडीओ काढू नका, अशी विनंती केली.

रवीनाने आईवर हात उचलला-

रॅश ड्रायव्हिंग प्रकणावर बोलत असतना पीडीत स्थायीक मोहम्मदने आपल्या आईवर रवीनाने हात उचलल्याचं म्हटलं आहे. या वेळी बोलत असताना मोहम्मद म्हणाला की, “माझी आई, बहीण आणि भाची हे रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाची गाडी आईवर धावून गेली. याविषयी जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा ड्राइव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली. नंतर रवीनासुद्धा कारमधून बाहेर आली आणि ती मद्यधुंद अवस्थेत होती. तिनेसुद्धा माझ्या आईवर हात उचलला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागला आहे.”

News Title : Raveena Tandon rash car driving assulting

महत्त्वाच्या बातम्या-

संजय राऊत एक्झिट पोलवर भडकले, म्हणाले…

अभिनेत्री रेखाबाबत शेखर सुमन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

गुड न्यूज! राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार

‘आपल्याकडे आयुष्यात दोन…’; ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट व्हायरल

बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज