बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रवीना टंडनचा बॉलिवूडबाबत मोठा खुलासा

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभिनेत्री रविना टंडनने ट्विट करत बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. माझंही करिअर उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले, असं रवीनाने म्हटलंय.

तुम्हाला चित्रपटांमधून काढून टाकलं जातं. हिरो त्याच्या गर्लफ्रेंडला चित्रपटात आणतो किंवा काही मित्रांच्या मदतीने चुकीच्या बातम्या पसरवून दुसऱ्यांचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. काही लोक ते सहन करू शकतात तर काही नाही, असं रवीनाने सांगितलं आहे.

तुम्ही जर याविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला ढोंगी म्हटलं जातं, वेडं समजलं जातं. हे या इंडस्ट्रीचं सत्य आहे. हे कोणासोबतही होऊ शकतं, असं रवीनाने म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्यावर जितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तितक्याच ताकदीने मी लढा दिला. घाणेरडं राजकारण सर्वत्र होतं. मला या इंडस्ट्रीबद्दल प्रेम आहे, पण इथे तणावसुद्धा खूप आहे. काही लोक चांगले आहेत तर काही राजकारण करणारेसुद्धा आहेत. हे जग असंच आहे, असंही रवीनाने म्हटलं आहे.

 

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“…हे म्हणजे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे”

“खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मॅनेजर दिल्लीत बसले आहेत”

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार-राजू शेट्टींच्या उपस्थितीत बारामतीत बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सध्याच्या घडीला मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही- नितीन गडकरी

सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकून धोनीला जबर धक्का, पाहा त्याची पहिली प्रतिक्रिया…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More