खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली

Raveena Tandon l मनोरंजनसृष्टीतुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रवीना धक्काबुक्की करताना दिसत आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे भागातील आहे. रविना टंडनच्या या व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या घटनेत कोणालाही मारहाण झाली नाही :

अभिनेत्री रवीना टंडनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रवीनावर एका वृद्ध महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वांद्रे भागातील रवीना टंडनचा भररस्त्यात वाद झाल्याचा हा व्हिडीओ आहे. कार उभी करण्यावरून झालेल्या वादामधून रवीना आणि तिच्या चालकाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

तर दुसरीकडे या घटनेत कोणालाही मारहाण झाली नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अखेर रवीनाने मौन सोडलं असून इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Raveena Tandon l रवीनाने इंस्टाग्राम पोस्ट करून मौन सोडले :

पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये रवीनाने सांगितले की, ‘रवीना आणि तिच्या ड्राइव्हरवर खोटे आरोप केले आहेत, ‘कोणालाच कारची धडक लागलेली नव्हती, यामध्ये कोणीच जखमी देखील झाले नव्हते, ‘ तसेच रवीना मद्यधुंद अवस्थेत देखील नव्हती, ड्राइव्हरची मदत करण्यासाठी ती घरातून बाहेर आली होती’, ‘त्या धक्क्यातून सावरत रवीनाने तिच्या कार ड्राइव्हरला वाचवलं आहे?’, ‘तसेच त्यावेळी माझ्या ड्राइव्हरला कोणीही हात लावू नका, मी विनंती करते की, त्याला मारू नका’, ‘अशा आशयाच्या बातम्या तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केल्या आहेत.

यासंदर्भात खार पोलिसांनी सीसीटीव्हीत तपासून चौकशी केली आहे. त्यावेळी संबंधित वृद्ध महिला ही रवीना टंडनच्या कारजवळच उभी होती, मात्र त्यांना कारची धडक देखील लागली नव्हती. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी रवीनासह चालकाने तिघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा मोठा आरोप केला आहे.

News Title – Raveena Tandon Viral Video

महत्त्वाच्या बातम्या- 

आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

…म्हणून जालन्यात महाविकास आघाडी बाजी मारणार?

प्रवास करणे महागले; टोल टॅक्सच्या किंमती तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ