अक्षय कुमार नव्हे तर ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात होती रविना टंडन
मुंबई | अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) सध्या चर्चेत आली आहे. काही काळ ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. नुकतंच तिनं काही चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून कमबॅक केलं आहे. यावर्षीचा पद्म पुरस्कार अभिनेत्री रविना टंडनला जाहीर झाला आहे. याचनिमित्ताने रविनाने एके ठिकाणी मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत.
अभिनेत्री रविना टंडनने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होत. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत रविनानं काम केलं आहे. याचदरम्यान अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सोबतदेखील रविनाने काम केलं आहे. त्याचदरम्यान अभिनेता संजय दत्त आपला क्रश होता,असा खुलासा रविनाने मुलाखतीदरम्यान केला आहे.
संजयचे वडील आणि माझे वडील खूप चांगले मित्र होते. मी संजू आणि प्रियाला लहानपणापासून ओळखते. संजूने नेहमीच मला लहान मुलासारखे वागवलं आहे. आजही तो तसाच वागवतो. माझा त्याच्यावर क्रश (crush) होता. त्याला हे माहित होतं. अरे देवा ‘मी आणि माझं तुटलेलं ह्रदय’ अशी मस्करीदेखील तिनं केली
दरम्यान, रविनाने संजय दत्तसोबत ‘जमाने से क्या डरना’, ‘आतिश’,’विजेता’ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. दोघेही 2022 ला प्रदर्शित झालेल्या KGF Chapter 2 या चित्रपटात एकत्र दिसले होते. ‘घुडचरी’ या चित्रपटातदेखील ते दोघं दिसले होते. ‘आरण्यक’ या बेवसिरीजचा दुसरा भाग येत असून रविना अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.