Raver Loksabha Election | रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Loksabha Election) एकच खळबळ उडाली आहे. अनेकांचं लक्ष हे रावेर लोकसभा मतदारसंघाकडे (Raver Loksabha Election) लागलं आहे. कारण याठिकाणी प्रतिष्ठेची लढत आहे. कारण याठिकाणी रक्षा खडसे विरूद्ध श्रीराम पाटील यांच्यात मतमोजणीवरून रान पेटलं आहे. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान हे भाजपला जात असल्याचा आरोप श्रीराम पाटील यांनी केला.
रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंची आघाडी
रावेरमध्ये सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या मतदारसंघातून रक्षा खडसे आघाडीवर आहे. तसेच श्रीराम पाटील यांना पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. रक्षा खडसे यांना 2 लाख 94 हजार 035 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 1 लाख 73 हजार 906 मिळाले आहेत. यामुळे आता श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएम मशीनची बॅटरी 99 टक्के कशी काय? असा सवाल त्यांनी केला आहे. यावर आता रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.
रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या की, श्रीराम पवार यांना माहिती आहे की आता रावेर लोकसभा मतदारसंघाची जगा त्यांच्या हातून चालली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शोधून ते हरकत घेत आहे. प्रशासन कोणतंही काम करत असताना नियमांच्या बाहेर जात कोणतंही काम करत नसल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. (Raver Loksabha Election)
“सर्वाधिक जागा या महायुतीच्या निवडून येतील”
रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवारच आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. दहा वर्षात जे काम केलं त्यावर आता जनता मला तिसऱ्यांदा निवडून देईल असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. एक महिला म्हणून मला त्याचं फार वाईट वाटत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. 100 टक्के काउंटिंग झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. मला विश्वास आहे सर्वाधिक जागा या महायुतीच्या निवडून येतील, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. (Raver Loksabha Election)
News Title – Raver Loksabha Election Raksha Khadse Against Shriram Patil Objection On EVM Machine
महत्त्वाच्या बातम्या
दिंडोरीत शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा धोका, अपक्ष भगरेंना मोठं मतदान
वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं
सर्वात मोठी बातमी! सेक्स स्कँन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्नाचा पराभव
राज्यातला पहिला जल्लोष, निकालाआधीच अमोल कोल्हेंकडून अशाप्रकारे आनंद साजरा
मावळमध्ये कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर