बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतासाठी आनंदाची बातमी! रवी दहियाचा धोबीपछाड देत फायनलमध्ये प्रवेश, सुवर्णपदकाची संधी

टोकियो | ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तींच्या सामन्यास सुरूवात झाली आहे. भारतासाठी आजचा दिवस चांगला जात आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारणाऱ्या रवी दहियाने फायनलमध्ये प्रवेश करत इतिहास रचला आहे. 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवत भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे.

रवी दहियाच्या फायनलमध्ये जाण्याने त्याचं वैयक्तिक रौप्य पदक निश्चित झालं असून त्याने अंतिम सामन्यात विजय मिळवला तर सुवर्ण पदकही मिळवू शकतो. 57 किलो वजनी गटात रवि कुमार दहियाने कझाकस्तानच्या मल्लाचा पराभव केला आहे.

याआधी रवीने बल्गेरियाच्या कुस्तीपटूविरूद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रवी दहियाने आक्रमक खेळी करत सुरूवातीपासून सामन्यावर वर्चस्व प्रस्तापित केलं होतं. अखेरच्या लढाईत त्याने 14-4 अशी आघाडी घेतली आणि टेक्निकल सुपियाॅरिटी जोरावर त्याने विजय मिळवला.

दरम्यान, रवी दहियाच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रवीने विजय मिळवला तर इतिहास रचणार आहे. याआधी सुशिल कुमारने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर 2016 साली साक्षी मलिकने कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

थोडक्यात बातम्या-

पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने केलं असं काही की…

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

“लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते”

“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More