Top News अमरावती महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण

अमरावती | खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. रवी राणा यांच्या आई वडिलांसह कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (Ravi rana-Navneet rana Family 7 people corona Positive)

नवनीत राणा यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आाला आहे. सुदैवाने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या अँटीजेन टेस्टचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. (Ravi rana-Navneet rana Family 7 people corona Positive)

नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस राणा यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. (Ravi rana-Navneet rana Family 7 people corona Positive)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांची प्रकृती खूपच बिघडली होती. काही केल्या त्यांचा ताप कमी होत नव्हता. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली गेली होती. मात्र ती चाचणी देखील त्यांची निगेटीव्ह आली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती आठवड्याभरात स्थिर झाली होती. (Ravi rana-Navneet rana Family 7 people corona Positive)

महत्त्वाच्या बातम्या-

“सत्ता गेल्याने ह्यांची डोकी कामातून गेली आहेत, फडणवीस तुम्ही दिल्लीली जा अन्…”

महाराष्ट्राची रूग्णसंख्या साडेचार लाखांच्या आसपास तर या शहरात सर्वाधिक अ‌ॅक्टिव्ह रूग्ण…

देशातल्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, रूग्णालयात केलं दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या