मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली

Ravi Rana | पश्चिम विदर्भामध्ये अमरावती येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित केली जाणारी दहीहंडी प्रसिद्ध दहीहंडीपैकी एक आहे. यावर्षी देखील अमरावती येथील नवाथे चौकात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राणा (Ravi Rana) यांनी याद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

याच कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील हजर होते. मागच्या वर्षी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आग्रह धरला होता की, नवनीत राणा यांनी भाजपच्या चिन्हावरून लढावे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यांनी भाजपच्या तिकीटावरून ही निवडणूक लढवली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, बावनकुळे यांनी भविष्यात आमदार रवी राणा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येथील असं मिश्किल वक्तव्य जाहीरपणे केलं होतं. त्याचाच आधार घेत रविवारी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नेमकं काय म्हणाले रवी राणा?

सुरुवातीला रवी राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन केले. यावेळी रवी राणा म्हणाले, “त्यांनी नवनीत राणा यांच्या विजयासाठी 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. नवनीत राणा जरी आपल्या भारतीय जनता पक्षासोबत आल्या तरी त्या तुमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. मी युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी भविष्यात कधीही भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही हे स्पष्ट करतो आणि धन्यवाद देतो.”, अशी स्पष्ट भूमिका रवी राणा (Ravi Rana) यांनी जाहीर केली.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या दहीहंडीला शुभेच्छा दिल्या. तसेच राणा दाम्पत्याचे कौतुक केले. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीतील घटक आहे त्यामुळे ते आणि आम्ही एकच आहोत, असं म्हणत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.

दरम्यान, लोकसभेत नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावरून लढल्या. मात्र, त्यांचा पराभव झाला. लोकसभेत महायुतीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राणा हे सावध पावले टाकत असल्याची चर्चा त्यांच्या या विधानामुळे होत आहे. रवी राणा (Ravi Rana) हे विधानसभेला भाजपपासून चार हात लांब राहण्याचे संकेत देत आहेत.

News Title : Ravi Rana rejected BJP offer

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!

पुण्यात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार

‘वनराज… तुला पोरं बोलवून ठोकतेच’; पोलिसांसमोर धमकी दिलेली ती कोण?

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांना संशय, मोठी माहिती समोर

सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या आजचा तोळ्याचा भाव