अमरावती | अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील, असं रवी राणांनी म्हटलं आहे.
रवी राणांच्या वक्तव्याने खळबळ
येणारा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे च गरजेचे आहेत. हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असं रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.
“उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील”
नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे. त्या खिडकीतून निकालाच्या वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या सोबत महायुतीत जातील, असा दावाही रवी राणा (Ravi Rana) यांनी केला. राणांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.
दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा (Ravi Rana) या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत अहकांरी नेत्याच्या अहंकाराचा चुराडा जनता करणार आहे. जनता त्यांना धडा शिकवणार आहे. अहंकारी नेत्याचा अहंकार दाबण्याचं काम जनतेने केलं असल्याचेही रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.
1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान झाले आणि लोकशाहीच्या उत्सवातील अंतिम पडाव पूर्ण झाला. आता 4 जूनच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लागलीच एक्झिट पोल जाहीर झाले. सर्वांनीच भाजपच्या बाजूने एकमत दिले आहे. पण काही राज्यांत भाजपच्या विजयाला काँग्रेस सुरुंग लावण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जान्हवी कपूरने सर्वांसमोरच बॉयफ्रेंड शिखरला…. ; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री रवीना टंडनचा मद्यधुंद अवस्थेतला ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल
‘मी कधीच बोल्ड सीन करणार नाही’; उर्फीने सांगितलं कारण