“शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपमध्ये जातील”

अमरावती | आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जातील, असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार हे 33 महिन्यांच्या सरकारला कंटाळलेले होते. त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता. तर देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार (Ajit Pawar) यांना विश्वास आहे, असं राणा म्हणालेत.

लवकरच अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल सध्या विविध चर्चा रंगत आहे. अजित पवार (Ajit Pawar) केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-