बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यामुळे शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार’, रवी राणांचं मोठं वक्तव्य

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात उतरल्याने चुरस पाहायला मिळत आहे.

राजकीय वातावरण तापलं असताना मतांच्या गणितावरून शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाची चिन्हं दिसत असताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली. मात्र, एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं विधानपरिषद निवडणुकीची आखणी केली ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार आहे, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर गेल्या 56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार आहे, असं वक्तव्य देखील रवी राणा यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अरुण गवळी पुन्हा येतोय!, पहायला मिळणार नवा थरार!

अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणारे सरकारच्या निशाण्यावर केली धडक कारवाई

भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

‘आमदारांना सातत्याने फोन येत आहेत’; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

अग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More