नवी दिल्ली | काँग्रेस दहशतवाद्यांचे मनोबल वाढवतेय असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे. काँग्रेस भारतीय सैन्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम करत आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय जवान दहशतवाद्यांना कमी आणि नागरिकांना जास्त मारत आहेत, असे वक्तव्य काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले होते. यामुळे पाकिस्तानला आनंद होत असेल असेही ते म्हणाले होते. त्यावरुन प्रसाद यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकच्या व्हीडिअोवरून राजकारण करु नये. बाकीच्या गोष्टींचाही विचार करावा, असेही प्रसाद म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-घाटकोपर विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पहा व्हीडिओ
-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी
-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला
-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!
-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली