बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!

मुंबई | राजकारणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेताना पाहायला मिळतात. पण बुधवारी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. रवी शास्त्री आणि कोश्यारींच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्रीडापटू किंवा खेळाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. पण रवी शास्त्री यांनी त्यांची भेट घेतली.

इंग्लंडविरुद्धची सीरिज संपल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी त्यांच्या टीममध्ये दाखल झाले आहेत तर रवी शास्त्री आता आराम करणार आहेत. कारण 9 एप्रिलला आयपीएल सुरु होणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असल्यामुळे ते कोणत्याही संघाला मार्गदर्शन करु शकत नाही.

दरम्यान, कोरोनानंतर टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये धूळ चारण्याचा विक्रम भारताने केला. यानंतर इंग्लंडविरुद्ध भारताने टेस्ट सीरिजमध्ये 3-1, टी-20 सीरिजमध्ये 3-2 आणि वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला.

थोडक्यात बातम्या-

“…तर मुंबईत दिवसाला 10 हजार कोरोना रूग्ण आढळतील”

देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख

‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोरोना लसीबाबत चिंता वाढवणारी बातमी; जगभरातील तज्ज्ञांच्या सर्व्हेने एकच खळबळ

पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More