नवी दिल्ली | बीसीसीआयकडून नुकतंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. दरम्यान या दौऱ्यात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादवला टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही. यावरून चाहत्यांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केलीये.
यावर आता टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी मौन सोडलंय. सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान का मिळत नाही यावर त्यांनी उत्तर दिलंय.
रवी शास्त्री म्हणाले, सध्या टीम इंडियामध्ये अनेक चांगले आणि तरुण खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत 30 वर्षीय खेळाडूला संधी मिळणं फार कठीण आहे. म्हणूनच मी तरुण खेळाडूंना संयम राखण्याचा सल्ला देत आहे.
“इतकंच नव्हे तर सुर्यकुमार यादव प्रमाणे आणखी 3-4 खेळाडू असे आहेत. ज्यांनी चांगली कामगिरी करून त्यांना टीममध्ये स्थान मिळालं नाहीये. टीममध्ये जेव्हा अनुभवी आणि तरुण खेळाडू भरलेले असतात अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं कठीण असतं,” असंही ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे”
“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”
…हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र- किशोरी पेडणेकर
भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी
‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार