रवी शास्त्रीच भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक, विराटचा हट्ट पूर्ण!

PHOTO- BCCI

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अखरे रवी शास्त्री यांचीच वर्णी लागलीय. झहीर खानकडे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. तर महत्वाच्या सामन्यांमध्ये राहुल द्रविड भारतीय फलंदाजांना फलंदाजीचं प्रशिक्षण देईल.

दरम्यान, काल दुपारी रवी शास्त्रींची प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. त्या वृत्ताचं बीसीसीआयनं खंडन केलं होतं. मात्र रात्री त्यावरच शिक्कामोर्तब झालं.

दुसरीकडे कोहलीला प्रशिक्षकपदी शास्त्रीच हवे होते, त्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीनं त्याचा हट्ट पूर्ण केल्याचं दिसतंय.