BCCI - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा निर्णय अद्याप नाही- बीसीसीआय
- खेळ

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा निर्णय अद्याप नाही- बीसीसीआय

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं बीसीसीआयनं म्हटलंय. 

प्रशिक्षक निवडीचे सर्व अधिकार क्रिकेट सल्लागार समितीतील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्याकडे आहेत. तेच यासंदर्भात निर्णय घेतील, असं बीसीसीआयनं म्हटलंय.

दरम्यान, आज रात्री उशिरापर्यंत प्रशिक्षकपदाचा निर्णय होणार असल्याचं समजतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा