रहाणेला संघाबाहेर बसवण्याचा कोहलीचा निर्णय योग्यच!

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवण्याच्या कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयाचं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी समर्थन केलंय. उलट पत्रकारांनाच त्यांनी खडे बोल सुनावले. 

रहाणेच्या ऐवजी आम्ही रोहित शर्माला खेळवण्याचा निर्णय घेतला. जर रहाणेला खेळवलं असतं आणि त्याची कामगिरी चांगली झाली नसती तर तुम्हीच आम्हाला रोहित शर्माला का खेळवलं नाही? असा सवाल विचारला असता, असं रवी शास्त्री म्हणाले.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे भारताला मालिका गमवावी लागलीय. त्यात रहाणेला संघाबाहेर बसवल्याने कोहलीला टीकेचा सामना करावा लागतोय.