मुंबई | भारतीय क्रिकेट संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली आहे. यावर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण असून हा विजय 1983 च्या वर्ल्डकपपेक्षाही मोठा असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. तसेच रवी शास्त्री यांनी या विजयाचं श्रेय विराटलाही दिलंय.
विराट शारिरीकरित्या अनुपस्थित असला तरीही त्याचा आभास संघासोबत होता, कारण हा संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही. गेल्या पाच ते सहा वर्षात संघ उभा राहिला आहे. यामागे विराट कोहलीची मेहनत आहे, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
भारतीय संघ मजबूत करण्यासाठी विराट कोहली गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सतत प्रयत्न करुन अखेर त्याचं फळ मिळाल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या”
‘सॉरी पप्पा, मला जगण्याचा अधिकार नाही’; फेसबुक पोस्ट करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
खासदारांना आता जेवणाचे पूर्ण पैसे भरावे लागणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
”जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ”
‘मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, त्यामुळे…’; अण्णा हजारेंचं मोदींना पत्र