झहीरऐवजी रवी शास्त्रींना भरत अरुण हवेत गोलंदाजी प्रशिक्षक?

PHOTO- BCCI

मुंबई | रवी शास्त्रींना भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून हवे आहेत, अशी माहिती मिळतेय. मात्र बीसीसीआयच्या सल्लागार समितीने ही जबाबदारी झहीर खानवर सोपवलीय. त्यामुळे झहीरच्या नावाला शास्त्रींचा विरोध आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.

रवी शास्त्री आणि भरत अरुण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. श्रीनिवासन यांच्या कार्यकाळातही शास्त्रींच्या मागणीनंतर अरुण यांची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआय याप्रकरणी काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या