बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’; संजय राठोडांच्या मतदारसंघातील शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यवतमाळ | राज्याच्या मंत्रिमंडळातील माजी वनमंत्री संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आले होते. या प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र अद्यापही वनमंंत्री पदाची जबाबदारी कोणालाही सोपवण्यात आला नाही. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेमधील शिवसेना नगरसेवकाने मंत्रीपदावर दावा केला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून शिवसेना निष्ठावंत म्हणून काम केलं आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे त्यामुळे मला वनमंत्री करा, अशी मागणी नगरसेवक रवी तरटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. रवी तरटे यांनी तहसीलदारांमार्फत पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलं आहे.

इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी अशी माझी मागणी आहे. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रिपद द्यावं, अशी मागणी तरटे यांनी केली आहे. याआधी माजी खासदाराने वनमंत्री पदावर नियुक्ती करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वनमंत्री पदावर नियुक्ती करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री  ठाकरे यांना केली होती. तर त्यावेेळी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हरिभाऊ यांना मंत्री केल्यास आम्ही स्वागत करू, असं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”

इशान किशनचं धूमधडाक्यात पदार्पण, भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

जखमी वाघिण जास्त घातक असते- ममता बॅनर्जी

आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू- अमित शहा

“राजकारणात काहीही होऊ शकतं नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More