रविकांत तुपकर म्हणजे नारळासाठी कुस्ती धरणारा पैलवान!

कोल्हापूर | जयसिंगपूर उस परिषदेत माझ्यावर ज्या दाढीवाल्याने टीका केली. अजून त्याला अनेक पावसाळे बघायचे आहेत. गावाकडील कुस्तीत ज्याप्रमाणे नारळासाठी कुस्ती धरणारे पैलवान असतात, त्यातील तो गडी आहे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविकांत तुपकर यांना लगावला आहे.

मी निवडणुकीला नेहमीच तयार असतो. कुठून लढायचं हे मी ठरवलेलं आहे. मी काही नारळसाठी लढणारा पैलवान नाही. विदर्भातून येवून इथं टीका करणारा पैलवान नारळासाठी लढणारा आहे. त्याची मला दखल घ्यायची गरज नाही, असंही खोत म्हणाले.

जयसिंगपूर ऊस परिषदेत अत्यंत खालच्या पातळीवर माझ्यावर टीका झाली. माझ्या पोष्टरला मारहाण झाली. याचाच अर्थ अजूनही त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपमध्ये बंडाचे संकेत; माजी मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा!

-…तर राज्यातील एस.टी. कर्मचारीही सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही- धनंजय मुंडे

-हे राज्य सरकार दळभद्री आहे; विखे-पाटलांचा घणाघात

-राज्यात 15 डिसेंबरपर्यंत एकही खड्डा सापडणार नाही- चंद्रकांत पाटील

-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; दुरदर्शनच्या कॅमेरामनसह तीन जण ठार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या