विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं?, रविकांत तुपकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Ravikant Tupkar | कालच हरियाणा आणि जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यानंतर सर्वांचं लक्ष आता महाराष्ट्राकडे असणार आहे. राज्यात लवकरच निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केल्या नसल्या तरी दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नेत्यांच्या राज्य दौऱ्याला देखील सुरुवात झाली आहे. तसेच, महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांचं आउटगोइंग आणि इन इनकमिंग देखील सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय. (Ravikant Tupkar )

अशात आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)आज (9 ऑक्टोबर) थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रविकांत तुपकर-उद्धव ठाकरे भेट

रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यातच या भेटीने या चर्चेला अजूनच उधाण आले आहे. आगामी काळात रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करत असून जवळपास 25 जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. (Ravikant Tupkar )

लोकसभा निवडणुकीला बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते.मात्र, त्यांचा येथे पराभव झाला होता. त्यांना जवळपास अडीच लाख मते मिळाली होती. अशात त्यांना विधानसभेचे तिकीट दिले जाऊ शकते. निवडणुकीत मतविभाजन आणि  नुकसान टाळण्यासाठी तुपकर यांच्याबाबत मविआ सकारात्मक चर्चा करू शकते, असं म्हटलं जातंय.

रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. त्यांनंतर पुण्यात महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा तुपकर यांनी केली होती. अशात बुलढाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. या दरम्यान तुपकर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. (Ravikant Tupkar )

News Title –  Ravikant Tupkar meets Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या- 

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!

RBI ने सर्वसामान्यांना दिला मोठा धक्का!

आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त?, काय आहेत सध्या 10 ग्रॅमचे भाव?

“महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार”; देवेंद्र फडणविसांचा विश्वास