रविकांत तुपकरांचा राजीनामा, स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडणार?

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला वेग आलाय. 

नुकत्याच पुण्यात झालेल्या स्वाभिमानीच्या बैठकीत सरकारला अल्टिमेटम देण्यात आलाय. मात्र त्यावर गांभीर्याने निर्णय होत नसल्यानं स्वाभिमानीनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, स्वाभिमानीच्या या पावलानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या