“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय”

बुलडाणा | गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना केला आहे.

रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर ते काल बुलढाण्यात पोहोचले. ढोलाच्या तालावर तुपकर यांची पायी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांवर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. उठसूठ कुणालाही फोन करत असतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय, असा घणाघाती हल्लाही रविकांत तुपकर यांनी चढवला आहे.

ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्यां ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये. योग्यवेळी तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराच तुपकर यांनी दिला.

मुख्यमंत्री तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन केला की सुसाट सुटतात. पोलिसांनी आमच्यावर केलेला लाठीमार हा बॉसच्या सांगण्यावरून केला, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-