अमरावती महाराष्ट्र

“अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु”

अमरावती | राज्य सरकारने केवळ 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केेलं  आहे ते पुरेसे नसून शेतकऱ्यांसाठीअतिरिक्त पॅकेज घोषित करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

केंद्राने सुद्धा मोठं मन केलं पाहिजे,त्यामुळे ही जबाबदारी कोणावर ढकलून चालणार नाही. आता दिवाळी आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढतील, असं तुपकर म्हणाले आहेत.

राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारनेही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं रविकांत तुपकर म्हणाले.

सरकारच्या बेपर्वा धोरणांमुळे शेतकरी भरडला जातो आहे, असा आरोप तुपकर यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…” 

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू 

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या