बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”

मुंबई | एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं महाविकास आघाडी सरकार पाडून नवं शिंदे सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे राज्यभरात फिरत आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. अशाच एका कार्यक्रमात महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची घटना घडली आहे. या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. हा सत्कार मुंबईमधील कुर्ला येथे पार पडला. या कार्यक्रमादरम्यान प्रंचड गोधंळ झाला होता. या गोधळांमुळे स्टेजवर असणाऱ्या महापुरूषांच्या प्रतिमांना धक्का लागला. या धक्क्याने सगळ्या प्रतिमा खाली पडल्या. यावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनीही यावरुन शिंदेंवर टीकास्त्र सोडवं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यावरून त्यांनी शिदे गटाला टोला लगावला आहे. सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर आमदार ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत. हिंदुत्वाचा ढोंगीपणा करून महाराष्ट्राला अपमानित करण्याचं काम बंडखोर आमदार करत आहेत, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला होता. राजकारण करा पण महापुरूषांचा अनादर होत असेल तर ते जनता सहन करणार नाही, असं ट्विट केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”

“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरुण सरदेसाईंना मोठा धक्का!

“…तरी देखील आदित्य ठाकरेंना मला साहेब बोलावं लागतं”, अन् रामदास कदमांना रडू कोसळलं!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More