महाराष्ट्र मुंबई

“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

मुंबई | राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत. जे साहेबांसाठी अंगठाच काय देह सुद्धा देतील, असं राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी युवकची आज (रविवार) मुंबईत बैठक पार पडली. यावेळी रविकांत वरपे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला.

पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ, असं म्हणत रविकांत वरपे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे.

सर्व एकलव्य मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बळकट करून साहेबांना गुरुदक्षिणा म्हणून आगामी विधानसभा निवडणूक जिंकून देतील, असा विश्वास वरपे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-काय उत्तम रित्या परतफेड केलीत; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आव्हाडांची चपराक

-‘हा’ आमदार म्हणतो काहीही होऊदे मी मात्र पवारांसोबतच!

-शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच; न्यायालयाचा निर्णय

-पती पत्नीने जिद्दीने एकत्र अभ्यास केला अन् राज्यसेवा परिक्षेत मिळवला पहिला, दुसरा क्रमांक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या