Top News

भाकड म्हशींच्या गोठ्याचे मालक होत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

मुंबई | राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवकचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी सचिन अहिर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे साहेब आपण भाकड म्हशींच्या गोठ्याचे मालक होत असल्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन, असं रविकांत वर्पे यांनी म्हटलं आहे.

या म्हशी आमच्याकडे असताना भरपूर पेंड खायच्या पण कुठल्याच कामाच्या नव्हत्या, त्यांनी कधी दूध दिलं नाही. मराठीत एक म्हण आहे; ही भाकड जनावरं कसायाला धार्जिण असतात हे खरं आहे, अशा शब्दात रविकांत वर्पे यांनी सचिन अहिर यांचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, पक्षानं मंत्रिपद तसेच मुंबई अध्यक्षपद देणाऱ्या सचिन अहिर यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टीका सुरु आहे.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-पवार साहेब एवढे ह्रदयात होते तर मग प्रेमभंग का केला??- सक्षणा सलगर

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या